वाघोली – शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे, युवासेनाप्रमुख तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना सचिव सुरज चव्हाण, शिवसेना उपनेते शिवाजी आढळराव पाटील, युवासेना सचिव वरुण सरदेसाई, रुपेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना सहसचिव विशाल सातव पाटील यांच्या संकल्पनेतून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसेच हौसिंग सोसायटीतील गणेशोत्सव मंडळांना शंभर टक्के पर्यावरण पूरक शेत मातीपासून बनविलेला पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी वृक्ष गजानन भेट देण्यात आला. या उपक्रमाला गणेशोत्सव मंडळाकडून चांगला प्रतिसाद मिळाला असल्याची असल्याची माहिती विशाल सातव यांनी दिली.
यावेळी शिवसेना सल्लागार राजेंद्र पायगुडे, वाहतूक सेना ज़िल्हाप्रमुख युवराज दळवी, उपप्रमुख राजेंद्र तांबे, युवासेना समन्वय प्रकाश लोले, शहर युवा अधिकारी ओंकार तुपे, सामाजिक कार्यकर्ते तुषार सातव, ओंकार पायगुडे, चेतन टाव्हरे, राहुल शेळके, आदी युवासैनिक उपस्थित होते.