सई ताम्हणकरच्या ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई – मराठी चित्रपटांमध्ये सध्या विविध विषय हाताळले जात आहेत. या विविध विषयांच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळताना दिसतोय. आता याच पठडीतला एक चित्रपट प्रक्षकांच्या भेटील येणार आहे. गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘कुलकर्णी चौकतला देशपांडे’. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करून हा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या चित्रपटात सई ताम्हणकर, राजेश श्रृंगारपुरे आणि निखील रत्नपारखी यांच्या मुख्य भूमिका आहेत. एका बिनधास्त, निर्भीड भूमिकेत सई पुन्हा झळकली आहे. राजेशने रांगडा प्रियकर साकारलाय तर निखील रत्नपाऱखी त्याच्या नेहमीच्या सहज अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar) on

‘कुलकर्णी चौकतला देशपांडे’ या चित्रपटाची निर्मिती स्मिता विनय गानू यांची असून गजेंद्र अहिरे यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन केले आहे. येत्या २२ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.