एका शानदार हॅट्ट्रिककडे वाटचाल करत असताना प्राइम व्हिडिओ आणि ऍक्सेल मीडिया ऍण्ड इंटरटेन्मेंटने ऍमेझॉन ओरिजिनल सिरीज “इनसाइड एज’च्या तिसऱ्या सीझनचा एक जबरदस्त ट्रेलर रिलीज केला आहे. करण अंशुमनद्वारा क्रिएट केलेला आणि कनिष्क शर्मा द्वारा दिग्दर्शित नवीन सीझनमध्ये कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील मोठ्या खेळात बरेच काही पणाला लागले आहे.
जगभरातील 240 हून अधिक देशांमध्ये आणि प्रदेशांमध्ये प्राइम मेंबर्स असलेल्या चाहत्यांना 3 डिसेंबर 2021 रोजी “इनसाइड एज सीजन-3’चे सर्व 10 एपिसोड प्रदर्शित करू शकतात. मैदानात आणि मैदानाबाहेर शत्रुत्व वाढत असताना भारतीय क्रिकेटच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत नवीन आणि घाणेरडे रहस्याचा उलगडा होणार आहे.
ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे, दोन सीझनच्या अद्भूत यशानंतर तिसरा भाग अधिक आश्चर्य, अधिक सस्पेन्स आणि अधिक मनोरंजनाचे वचन देतो जे नाट्यमय वळण वाढवते. ही वेब सिरीज पाहण्यासाठी चाहत्यांमधील उत्सुकता वाढली आहे. या वेब सिरीजचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. यावर असंख्य चाहत्यांनी कमेंट्स शेअर केल्या आहे.