पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- शिवाजीवर ते हिंजवडी मेट्रोचे काम सुरू असून] सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात खांब उभे करण्यात येत आहेत. यामुळे गणेशखिंड रस्ता, औंध रस्ता, बाणेर रस्त्यावर वाहतूककोंडी होत आहे. यामुळे शिवाजीनगरहून औंध, सांगवी, पिंपरी चिंचवड आणि हिंजवडीकडे जाणाऱ्या मार्गात तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आले आहेत. दि. १० फेब्रुवारीपासून हे आदेश लागू झाले आहेत.
वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग
-शिवाजीनगरहून गणेशखिंड रस्त्याने औंध, सांगवी, पिंपरी चिंचवड, हिंजवडीकडे जाण्यासाठी एबिल हाऊस येथून उजवीकडे वळण घेवून सरळ रेंजहिल्स, सिंफनी चौकमार्गे साई चौक खडकी, डॉ. आंबेडकर चौक बोपोडी-सरळ स्पायसर चौक मार्गे ब्रेमेन चौकातून जावे
– औंध गावाकडून शिवाजीनगर व पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या वाहनांनी ब्रेमेन चौकातून डावीकडे वळून स्पायसर जंक्शन, डॉ. आंबेडकर चौक, साई चौक खडकी, रेंजहिल्स चौकमार्गे जावे.
– एबिल हाऊस चौकामध्ये रेंजहिल्सकडून येवून उजवीकडे वळण घेण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी
-गणेशखिंड रस्त्यावरील संगण्णा धोत्रे पथ जाण्या-येण्यास दुहेरी मार्ग सुरू राहील
– गणेशखिंड रस्त्यावरील खाऊ गल्लीमार्गे ओम सुपर मार्केट सर्कलकडे जाण्यासाठी एकेरी वाहतूक.
– सिंबायोसिस कॉलेजकडून खाऊ गल्लीतून गणेशखिंड रस्त्यावर येण्यास बंदी
खासगी ट्रॅव्हल्स बससाठी नियम
– संचेती हॉस्पिटल चौकातून गणेशखिंड रस्त्याने विद्यापीठ चौक, औंधमार्गे पिंपरी चिंचवड, हिंजवडीकडे जाणाऱ्या तसेच तिकडून संचेती हॉस्पिटल चौकात येणाऱ्या सर्व प्रकारच्या खासगी ट्रॅव्हल्स बसेसना सकाळी ८ ते रात्री साडेदहा वाजेपर्यंत प्रवेश बंद असेल.
पर्यायी मार्ग:
– जुना पुणे मुंबई महामार्गावरुन हॅरिस ब्रिजमार्गे पुणे शहरामध्ये यावे. तसेच शहरातून जावे किंवा बायपासमार्गे कात्रज खडी मशिन चौकमार्गे जावे तसेच यावे.