चिंबळी -खेड तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात असलेल्या चिंबळी, कुरूळी परिसरातील विविध भागांमध्ये पारंपरिक पद्धतीने महिलांनी मकरसंक्रातीचा सण केला उत्साहात साजरा करण्यात आला.
खेड तालुक्यातील दक्षिण भागातील चिंबळी परिसरातील कुरूळी, मोई, निघोजे, केळगाव, मरकळ, गोलेगाव, सोळू, धानोरे, वडगाव, घेनंद, चऱ्होली खु., मोशी, डुडूळगांव परिसरातील जानेवारी महिन्यातील नवीन वर्षाच्या सुरुवातीला महिलांचा पहिला सण म्हणजे मकरसंक्रातीची सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.
यानिमित्त महिलांनी ताटामध्ये ऊस, बोरे, गाजर, पावटा शेगं, ज्वारीचे कणीस, हरभरा, गव्हाची ओंबी सुगडीत ठेवून मंदिरात देवांना त्या अर्पण केल्या.
या परिसरातील महिलांनी श्रीक्षेत्र आळंदी व देहू येथेही जाऊन माउली, तुकाराम महाराज मंदिरात दर्शन घेऊन एकमेकींना हळदी-कुंकू आणि तीळगुळ देऊन गोड बोला असा संदेश दिला.
याबरोबरच गावातील विविध मंदिरात जाऊन दर्शन घेऊन तिळगुळाच्या पोळीचा नैवेद्य दाखवून मकरसंक्रातीचा सण उत्साहात साजरा केला.