शेलपिंपळगाव (पुणे) : खेड तालुक्यात गेल्या दोन तासांपासून ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. याबाबत हवामान विभागाने कालच जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला होता.
तालुक्यातील अनेक गावांमध्ये सायंकाळी मुसळधार पावसाने सुरुवात केली आणि एक ते दोन तासात रस्त्यांना ओढ्या नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले.
चाकण, आळंदी, कडाचीवाडी, भोसे, रासे, शेलगाव, शेलपिंपळगाव, वडगाव, बहुळ, चिंचोशी या गावातील शेतकरी वर्गाचे पावसामुळे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे
चाकण भागात मोठया प्रमाणात कंपन्या असल्याने चाकरमानी घरी जाताना कशीबशी वाट काढत घरी जाण्याचा प्रयत्न करत होता परंतु पावसामुळे खूप अडचणींना सामोरे जावे लागत होते.
सुमारे एक ते दोन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून हाताशी आलेली पिके वाहून गेली आहेत…