नगर – राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील आठवडे बाजारात गर्दीचा फायदा घेवून मोबाईल चोरणारे दोघे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून 15 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी सोमनाथ रमेश आवारे (वय-21, रा. गांधीनगर, बीड), जाकीर सिंकदर शेख (वय-24. रा. नुरकॉलनी, गांधीनगर बीड) या दोघास ताब्यात घेतले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा आवारे यांनी केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार नानेकर, सुनील चव्हाण, संदीप पवार, सुरेश माळी, रवींद्र कर्डीले, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, संदीप दरंदले, मच्छिंद्र बर्डे, बाळासाहेब भोपळे या पथकाने गांधीनगर परिसरात सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले.