ऑक्सिजन टँकरना टोल माफ

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ; कंटेनरला आपत्कालीन वाहनांसारखी वागणूक

नवी दिल्ली: भारतात कोविड 19 (Covid-19) चे महाभयानक थैमान थांबवण्याचे नाव घेत नाही. गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाचे 4 लाखांहून अधिक नवीन रुग्ण सापडले आहेत. देशभरातील राष्ट्रीय महामार्गांमधून लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (LMO) वाहतूक करणार्‍या टँकर आणि कंटेनरना टोल शुल्कापासून सूट देण्यात आलीय, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने शनिवारी दिली.

ऑक्सिजन घेऊन जाणाऱ्या कंटेनरला इतर आपत्कालीन वाहनांसारखी वागणूक मिळणार. कोविड 19 साथीच्या काळात देशातील वैद्यकीय ऑक्सिजनची अभूतपूर्व मागणी लक्षात घेऊन ऑक्सिजन घेऊन जाणाऱ्या कंटेनरला इतर आपत्कालीन वाहनांसारख्या वागणूक दिली जाईल आणि दोन महिने किंवा पुढील आदेश येईपर्यंत त्यांना सूट देण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे.

NHAI म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्गावर लिक्विड मेडिकल ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या टँकर आणि कंटेनरना टोल प्लाझामधून सूट देण्यात आलीय. टोल प्लाझावर नंतरच्या वेळेस शून्य प्रतीक्षा वेळ लागेल, परंतु ते आधीपासूनत वैद्यकीय ऑक्सिजनच्या जलद आणि अखंडित वाहतुकीसाठीच्या अशा वाहनांना प्राधान्य देत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.