“कसोटी जिंदगी की’ या मालिकेतील एरिका फर्नांडिस सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असते. टीव्हीवर संस्कारी बहु म्हणून वावरणारी एरिका फर्नांडिस प्रत्यक्षात खूपच स्टायलिश आणि फॅशनेबल आहे. तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका फोटोमध्ये तिचा अफलातून अवतार बघायला मिळाला आहे. या फोटोत ती एखाद्या रोमन साम्राज्याची लढवय्या राणी दिसते आहे.
View this post on Instagram
डोक्यावर शिरस्त्राण आणि हातामध्ये तलवार घेऊन उभी असलेली एरिका बघितल्यावर फॅन्सनी तिला “सुपरवुमन’ असेच म्हणायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत या फोटोला पावणेदोन लाखांपेक्षा अधिक लाइक मिळाले आहेत.
View this post on Instagram
याच्या अगोदरही एरिका फर्नांडिसने काळे आणि पांढऱ्या पॅन्ट-सूटमधील एक ग्लॅमरस फोटो पोस्ट केला होता. त्यालाही लोकांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिला होता. “कसोटी जिंदगी की’ व्यतिरिक्त एरिका “कुछ रंग प्यार के ऐसे भी’ या मालिकेतही विशेष लक्षवेधी ठरते आहे. या सिरीयलचा तिसरा सिझन लवकरच सुरू होणार आहे.