नवी दिल्ली – टोकियो ऑलिम्पिकला पात्र ठरलेला भारताचा नवोदित टेनिसपटू सुमित नागल याने या स्पर्धेत सरस कामगिरी करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
ऑलिम्पिक खेळण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. माझेही स्वप्न पूर्ण होत असून, आता जबाबदारीने खेळ करत देशासाठी पदक जिंकण्याच्या जिद्दीनेच प्रत्येक सामना खेळणार, असेही त्याने म्हटले आहे.
नागल याला ऑलिम्पिकसाठी पुरुष एकेरीच्या गटात स्थान मिळाले आहे. अव्वल टेनिसपटूंच्या माघारीमुळे नागलला आता देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. अखिल भारतीय टेनिस असोसिएशनने (एआयटीए) दिविज शरणचे नामांकन रद्द करत आता सुमितला रोहन बोपण्णाच्या साथीने पुरुष दुहेरीत स्थान दिले आहे.
करोनाच्या कठोर नियमावलीमुळे अनेक खेळाडू ऑलिम्पिकमधून माघार घेत असल्याने सुमितचे स्थान निश्चित झाले आहे. 148 व्या क्रमांकावरील प्रज्ञेश गुणेश्वरनही संधीच्या प्रतीक्षेत आहे.