आजचे भविष्य (बुधवार, १२ मे २०२१)

मेष : घरात पाहुण्यांची सरबराई करावी लागेल. त्यासाठी वेळ व पैसे खर्च होतील. समाधान मिळेल.

वृषभ :  घरात छोटासा समारंभ पार पडेल. कुटुंबातील प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करण्यात यश येईल.

मिथुन : आरोग्यमान सुधारेल. घरात महिला मनःशांतीसाठी विशेष उपाय योजतील. मदत करतील.

कर्क :  सहकारी कामात घरात मुलांच्या प्रगतीबाबत चांगली घटना घडेल. वातावरण आनंदी राहील.

सिंह :  बोलण्याने गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. तडजोडीचे धोरण ठेवलेत तर लाभ तुमचाच होईल.

कन्या : घरात सहजीवनाचा आनंद घ्याल. मुलांच्या प्रगतीचे स्वप्न साकार होईल. सुवार्ता कळेल.

तूळ : गरजेच्या गोष्टींना प्राधान्य दया. घरात सर्वांशी सलोख्याने वागा. मुलांकडून अपेक्षित यश कळेल.

वृश्‍चिक : नवीन खरेदीचा आनंद घेता येईल. विवाहोत्सुक तरूणांना योग्य कालावधी. पैशाची तात्पुरती सोय होईल.

धनु : महिलांनी प्रकृती सांभाळावी. दगदग धावपळ कमी करावी. मनाप्रमाणे कामे पूर्ण झाल्याचा आनंद मिळेल.

मकर : वरिष्ठांनी सोपवलेल्या कामात युक्तीचा वापर कराल. सवलतही मिळवाल घरात महत्वाची बातमी कळेल.

कुंभ : महिलांना मानसिक शांतता लाभेल, प्रकृतीमान सुधारेल. कलावंत खेळाडूंना मानसन्मानाचे योग येतील.

मीन :  कलाकार, खेळाडूंना प्रावीण्य दाखवण्याची संधी मिळेल. प्रतिष्ठा वाढेल. महिलांना खरेदीचा आनंद घेता येईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.