-->

आजचे भविष्य (मंगळवार,१६ फेब्रुवारी २०२१)

मेष : स्वभाव थोडा मूडी राहील त्यामुळे सभोवतालच्या व्यक्‍तींकडून नवीन अनुभव येतील.

वृषभ : तुमच्या इच्छाआकांक्षा सफल होतील. मनातील बेत प्रत्यक्षात साकार होतील. कामाचा ताण वाढेल.

मिथुन : ग्रहमान व वातावरणाची साथ राहील. कामाचा उत्साह वाढेल. कार्यपद्धतीत बदल करून विस्तार कराल.

कर्क : जसा चष्मा घालाल तसे दिसेल तेव्हा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. व्यवसायात कामात स्वयंसिद्ध रहा.

सिंह : तुम्हाला जे पटेल रूचेल तेच कराल. त्यामुळे थोडा विरोधही पत्करावा लागेल.

कन्या : पैशाशिवाय सर्व व्यर्थ हे लक्षात येईल. व्यवसायात जेवढे काम जास्त कराल तेवढा तुमचाच लाभ होईल.

तूळ : अनुकूल ग्रहमान राहील. व्यवसायात कामाचा झपाटा राहील. कमी श्रमात जास्त यश मिळेल.

वृश्‍चिक : व्यवसायात कामाचा व्याप व विस्तार वाढेल त्यामुळे खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल.

धनु : मानले तर समाधान मिळेल. सकारात्मक दृष्टिकोन जीवनाला कलाटणी देण्यास उपयोगी पडेल.

मकर : “रात्र थोडी सोंगे फार” अशी अवस्था तुमची असेल. व्यवसायात काही उत्साहवर्धक घटना घडतील.

कुंभ :  तुम्ही मोठया उमेदीने व उत्साहाने कामाला लागाल. काम करताना जीवनाचा आस्वादही घ्याल.

मीन :  फायदा मिळवून देणाऱ्या कामांना प्राधान्य देऊन व्यवसायात यशस्वी वाटचाल कराल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.