मेष : नोकरीत सकारात्मक दृष्टिकोन फार उपयोगी पडेल. इतरांना न जमणारी कामे हाती घेऊन यश मिळवाल.
वृषभ : रेंगाळलेले प्रश्न मार्गी लावाल. आर्थिक देणी देता येतील. जुनी येणी वसूल होतील. सामाजिक कार्य कराल.
मिथुन : नोकरीत वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. कौतुकास पात्र अशी कामगिरी हातून घडेल.
कर्क : वरिष्ठांची मर्जी तुमच्यावर राहील. कौटुंबिक स्वास्थ्य महिलांना उत्तम लाभेल. आरोग्य ठीक राहील.
सिंह : नोकरी करणाऱ्या महिलांना सुसंगती लाभेल. तुमची जिद्द व आत्मविश्वास हा वाखाणण्याजोगा असेल.
कन्या : व्यवसायात भाग्यवर्धक घटना घडतील. नवीन कार्यक्षेत्र निवडून मिळालेल्या संधीचा फायदा करून घ्याल.
तूळ : नोकरीत कामाचा उरक ठेवाल. नावलौकिक मिळवाल. परदेश व्यवहाराच्या कामांना गती येईल.
वृश्चिक : कामानिमित्ताने नवीन मित्र जोडले जातील. महिलांना कामाचा हुरुप येईल. स्वास्थ्य लाभेल.
धनू : नवीन खरेदीचे मनसुबे साकार होतील. तरुणांना नवीन व्यक्तींचे आकर्षण वाटेल. अभ्यासाला पूरक ग्रहमान.
मकर : व्यवसायात व्यवहारी दृष्टिकोन ठेवावा. अर्थप्राप्ती चांगली झाली तरी पैशाची आवक जावक सारखी राहील.
कुंभ : नवीन कामे मिळवताना दगदग धावपळ करावी लागेल. कामात बेफिकीर राहून चालणार नाही.
मीन : नोकरीत “”शब्द हे शस्त्र आहे” हे लक्षात ठेवून बोलावे. कुणाकडून कुठलीही अपेक्षा ठेवू नये.