नवी दिल्ली – भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्या अटकेच्या मागणीसाठी कुस्तीपटूंचा संप अद्यापही सुरूच आहे. कुस्तीपटूंच्या या संपाला 19 दिवस पूर्ण झाले आहेत. ब्रिजभूषण सिंग यांच्या निषेधार्थ कुस्तीपटुंकडुन 11 मे म्हणजेच आजचा दिवस ब्लॅक डे’ म्हणून साजरा केला आहे.
त्यांच्या समर्थनार्थ सकाळी 10:00 ते दुपारी 2:00 वाजेपर्यंत काळ्या पट्ट्या बांधून लोकांनी निदर्शने करावी. आणि जंतरमंतरवर जास्तीत जास्त संख्येने पोहोचावे, अशी मागणी त्यांनी देशवासियांना करण्यात आली होती. विनेश फोगट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक, सत्यव्रत कादियान, जितेंद्र किन्हा आणि इतर कुस्तीपटूंनी आज 11 मे जंतर-मंतर येथे आंदोलनाच्या दिवशी डोक्यावर आणि हातावर काळ्या पट्टी बांधल्या होत्या.
यावेळी त्यांच्या समर्थकांनी देखील हातावर काळ्या फिती बांधल्या होत्या. यावेळी कुस्तीपटूंनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रिजभूषण यांच्यावर महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचा आरोप केला असून त्यांच्या अटकेची मागणी केली आहे.