पुणे: सार्वजनिक बांधकाम विभागात (पीडब्ल्यूडी) कार्यरत असलेल्या शाखा अभियंत्याला अडीच लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी दुपारी चार वाजता रंगेहात पकडले.
विलास तांभाळे असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या शाखा अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंडगार्डन परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय असून त्याठिकाणी विलास शाखा अभियंता आहेत. तक्रारदाराचे काम करून देण्यासाठी त्यांनी अडीच लाखांची मागणी केली होती.
त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार एसीबीने दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास विलास यांना तक्रारदाराकडून अडीच लाख रुपये घेताना रंगेहात पकडले. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात खळबळ उडाली आहे.