बारामती : कोऱ्हाळे बुद्रुक येथील कोरोना संक्रमित रुग्णाची 75 वर्षीय पत्नी कोरोना संक्रमित असल्याचे आढळून आले आहे. कोऱ्हाळे बुद्रुक येथील 90 वर्षीय वृद्ध व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णाच्या संपर्कातील अकरा जणांची covid-19 तपासणीसनी करण्यात आली. एक अहवाल पॉझिटिव तर इतर दहा अहवाल निगेटिव्ह आले आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे.
कोऱ्हाळे बुद्रुक गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. गावच्या सीमा बंद करण्यात आल्या असून पाच किलोमीटरचा परिसर बफर झोन म्हणून घोषित केला आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे.