मुंबई – टायटॅनिक चित्रपट जगभर प्रसिद्ध आहे. या चित्रपटात जॅकची भूमिका साकारणारा देखणा हिरो लिओनार्डो डिकॅप्रिओ आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. सध्या लिओनार्डो एका भारतीय वंशाच्या मॉडेलला डेट करत असल्याच्या चर्चा आहे. लिओनार्डो सध्या 48 वर्षांचा आहे. टायटॅनिक चित्रपटामुळे आजही जगभर त्याचे आहेत.
नीलम गिल असं या मॉडेलच नाव आहे. 28 वर्षीय नीलम लंडनमधील चिल्टर्न फायरहाऊसमध्ये लियोनार्डोसोबत स्पॉट झाली होती. यानंतर दोघांच्या डेटिंगच्या अफवा बातम्या समोर यायला सुरुवात झाली. त्यानंतर सोशल मीडियावर देखील नीलम गिलची चर्चा सुरु झाल्याचे पाहायला मिळाले. नीलम गिल हे हॉलिवूडमधील मॉडेलिंग इंडस्ट्रीतील अनेक वर्षांपासून प्रसिद्ध नाव आहे.
स्वत:ला ब्रिटीश-पंजाबी मॉडेल म्हणणारी नीलम वयाच्या १४व्या वर्षापासून मॉडेलिंग करत आहे. सुमारे एक दशकापूर्वी, नीलम गिलने बर्बेरी मोहिमेत सहभागी होणारी पहिली भारतीय मॉडेल बनून इतिहास रचला. बर्बेरी हा ब्रिटीश ब्रँड आहे.नीलम भारतात पार पडलेल्या एका फॅशन शोमध्ये देखील यापूर्वी दिसली होती. मात्र सध्या ती टायटेनिक स्टारसोबत स्पॉट झाल्याने चर्चेत आली आहे.
नीलमच्या आधी लिओनार्डोचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. लिओनार्डोने यापूर्वी कॅमिला मोरोनला डेट केले आहे. 4 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांचे गेल्या वर्षी ब्रेकअप झाले होते. यानंतर त्याचे नाव सुपरमॉडेल गिगी हदीदसोबतही जोडले गेले. आता अभिनेता नीलम गिलला डेट करत असल्याचं बोललं जात आहे.