‘या’ देशात पुन्हा एकदा टिकटॉकवर बंदी

इस्लामाबाद – अनुचित सामुग्रीवर नियंत्रण ठेवण्यास अपयशी ठरल्यामुळे पाकिस्तानने पुन्हा एकदा टिकटॉक या चीनच्या व्हिडीओ ऍपवर बंदी घातली आहे. इलेक्‍ट्रॉनिक क्राईम ऍक्‍ट 2016 च्या तरतूदींखाली टिकटॉक ऍप आणि वेबसाइटवर बंदी घालण्यात आली आहे, असे पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन ऍथोरिटीने केलेल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे.

टिकटॉकवर सातत्याने अयोग्य सामुग्री अपलोड केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. ही अयोग्य सामुग्री रोखण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याचेही निदर्शनास आल्याने ही बंदी घालण्यात आली आहे, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.

सर्वात पहिल्यांदा ऑक्‍टोबर 2020 मध्ये टिकटॉकवर बंदी घालण्यात आली होती. मात्र अश्‍लीलता पसरवणाऱ्या अकाऊंटला ब्लॉक केले जाईल, असे आश्‍वासन टिकटॉकने दिल्यावर 10 दिवसांनंतर ही बंदी उठवण्यात आली होती.

यावर्षी मार्चमध्ये पेशावर हायकोर्टाने या ऍपवर बंदी घातली होती. ही बंदी एप्रिलमध्ये उठवण्यात आली होती. गेल्या महिन्यात सिंध हायकोर्टानेही अशाच प्रकारे देशात टिकटॉकवर बंदी घालण्याचे आदेश पाकिस्तान सरकारला दिले होते. मात्र केवळ तिनच दिवसांनी ही बंदी देखील उठवण्यात आली होती.

गेल्या तीन महिन्यात तब्बल 60 लाख व्हिडीओ हटवण्यात आले असल्याचे टिकटॉकने म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.