स्पेस वेडींगचे स्वप्न होणार साकार; मोजावे लागणार तब्बल ‘इतके’ लाख रुपये

अमेरिकन कंपनीने तयार केला विशेष बलून

वॉशिंग्टन – आधुनिक जगात विविध प्रकारे विवाह केले जातात. काहीतरी वेगळे करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. आता याच स्वप्नांचा पुढील भाग समोर आला असून विवाहेच्छु जोडप्यांचे स्पेस वेडींगचे म्हणजेच अंतराळात विवाह करण्याचे स्वप्न साकार होणार आहे. अवकाशात लाख फूट उंचीवर विवाह सोहळा आता होऊ शकणर आहे.

अमेरिकेतील फ्लोरिडा येथील स्पेस पर्स्पेक्‍टिव्ह या कंपनीने हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी एका खास स्पेस बलूनची निर्मिती केली आहे.

या स्पेस बलूनमधून एकदा प्रवास करण्यासाठी तब्बल 93 लाख रुपये मोजावे लागणार आहेत 2024 पासून या प्रवासाला सुरुवात होणार आहे. या बलूनमधून एका वेळी 8 लोकांनी प्रवास करणे शक्‍य होणार आहे. 

त्यामुळे अमेरिकेतील काही जणांनी विवाह समारंभ करण्यासाठी या बलूनचे बुकिंग केले आहे. वाढदिवस आणि इतर कॉर्पोरेट समारंभासाठी या बलूनचा वापर करता येणार आहे. बलूनमधून प्रवास करताना 360 डिग्रीमध्ये पृथ्वीचे दर्शन होणार आहे. हा प्रवास सहा तासांचा असणार असून या बलूनमध्ये बाथरूमसारख्या सुविधाही असणार आहेत. स्पेस पर्स्पेक्‍टिव्ह या कंपनीने जून महिन्यात या बलूनचे टेस्टिंग केले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.