तिबेटची जनताच ठरवणार माझा उत्तराधिकारी – दलाई लामा

नवी दिल्ली : बौद्घ धर्मगुरू दलाई लामा यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, आपल्या उत्तराधिकाऱ्याचा निर्णय केवळ तिबेटची जनताच घेवू शकते असे दलाई लामा यांनी म्हटले आहे. काही दिवसांपुर्वी चीनने दलाई लामा यांच्या उत्तराधिकाऱ्याचा निर्णय लवकरच घेणार असल्याचे म्हटले होते. त्याला उत्तर देताना दलाई लामा यांनी आपला उत्तराधिकारी चीन ठरवू शकत नसल्याचे म्हटले आहे.

दलाई लामा यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या निवडीत भारताने हस्तक्षेप करू नये अशी चेतावणी चीनने काही दिवसांपुर्वी भारताला दिली होती. त्यावर दलाई लामा यांनी चीनला स्पष्टपणे उत्तर देत आपल्या उत्तराधिकाऱ्याचा निर्णय आपण स्वत: किंवा चीन घेवू शकत नसल्याचे म्हटले आहे. तसेच याचा संपुर्ण निर्णय हा तिबेटची जनताच घेणार असल्याचे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.