समर्थ संकुलात राज्यस्तरीय खो-खो पंच शिबीर

अणे – महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व पुणे जिल्हा खो-खो असोसिएशन आणि समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट संचलित, समर्थ ग्रुप ऑफ इस्टिट्युशन्स बेल्हे (ता. जुन्नर) यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच समर्थ शैक्षणिक संकुलात दोन दिवसीय राज्यस्तरीय पंच मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंचांची भूमिका निभावत असलेले 24 जिल्ह्यांमधून सुमारे 250 क्रीडा शिक्षक सहभागी झाले होते.

भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजन करून शिबिराचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र खो- खो असोसिएशनचे कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटनिस संदीप तावडे, खजिनदार गोविंद शर्मा, ऍड. अरुण देशमुख तसेच संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्‍वस्त वल्लभ शेळके, जुन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष गणेश राऊत, हरिश्‍चंद्र नरसुडे त्याचप्रमाणे महाराष्ट्र खो खो असोसिएशन चे विश्‍वस्त, उच्चस्तरीय सल्लागार समिती, पंच मंडळ सचिव प्रशांत पाटणकर, तांत्रिक समिती सचिव नरेंद्र कुंदर, स्पर्धा समिती यांचे सर्व सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. पहिल्या दिवशीच्या सत्रात व्हिडीओ व त्या अनुषंगाने चर्चा, लेखी परीक्षा (इंग्रजी व मराठी), सांख्यिकी प्रश्‍नपत्रिका (इंग्रजी व मराठी), क्रीडांगण व समूह चर्चा अशा स्वरूपाचे नियोजन करून खो-खो खेळाविषयी पूर्ण माहिती, नियम व त्यासंदर्भात पंचांची कामगिरी, भूमिका, अंमलबजावणी याबाबत सविस्तर चर्चा व मैदानावरील प्रात्यक्षिकातून शंकांचे निरसन करण्यात आले. दुसऱ्या दिवशीच्या सत्रात मौखिक व प्रात्यक्षिक परीक्षा व चर्चासत्र झाल्यानंतर शिबिराची सांगता करण्यात आली.

दोन दिवसीय शिबिराच्या अनुषंगाने संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांबाबत समाधान व्यक्त करत मुंबई उपनगरच्या क्रीडा शिक्षिका प्रज्ञा चव्हाण, रत्नागिरी चे अनिल भंडारी यांनी मनोगत व्यक्त केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)