“दबंग 3′ नंतर थोड्याच दिवसात सलमान खान आपल्या फॅन्ससाठी “राधे’ घेऊन येणार आहे. ईदच्या मुहुर्तावर रिलीज करायचा म्हणून या सिनेमाचे शुटिंग खूपच दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले आहे. “राधे’मध्ये सलमान खानला एक, दोन नाही तर चक्क तीन व्हिलनबरोबर पंगा घ्यायचा आहे.
गौतम गुलाटी, रणदीप हुडा आणि सिक्कीमचा ऍक्टर सॅंग हुए हे तिघेजण सलमानच्या विरोधात उभे ठाकलेले असणार आहेत. सलमानच्याच सूचनेवरून रणदीप हुडाने “राधे’ती व्हिलनचा रोल स्वीकारला आहे. यातील एका ऍक्शन सिक्वेन्सदरम्यान त्याच्या गुडघ्याला जबर दुखापत देखील झाली आहे. एवढेच नव्हे तर ऍक्शन सीनसाठीही “राधे’साठी तीन वेगवेगळे डायरेक्टर नियुक्त केले गेले आहेत. सलमानबरोबर दिशा पाटणी लीड रोलमध्ये दिसणार आहे.
प्रभु देवाच्या डायरेक्शनखालील “राधे’20 ने रोजी रिलीज करायचे असे ठरले आहे. पण आता करोनाच्या साथीमुळे शुटिंग काही दिवसांसाठी थांबवले गेले आहे. त्यामुळे रिलीज डेट बदलली जाण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या सुटीचा फायदा मिळवायचा सलमानचा बेत यावेळी फसण्याची शक्यता आहे.