पुणे : शहरातील कोरोनाचा विषाणू पसरू नये म्हणून शहरातील सर्वच विभाग पुढे सरसावले आहेत. त्यातच आता या आजाराला अटकाव घालण्यासाठी महापालिकेकडून शहरातील सर्व उद्याने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्यानात नागरिक एकत्र येत असल्याने संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचाही समावेश आहे.