भोपाळ -मध्यप्रदेशमधील तीन आमदारांनी मंगळवारी सत्तारूढ भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामध्ये एका अपक्षाचा तसेच बसप आणि सपच्या प्रत्येकी एका आमदाराचा समावेश आहे.
पुढील महिन्यात राष्ट्रपतिपदाची निवडणूक होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर, तीन आमदारांच्या भाजप प्रवेशाला महत्व प्राप्त झाले आहे. त्या आमदारांमुळे राष्ट्रपती निवडणुकीत भाजपच्या मतांचे मूल्य वाढणार आहे. त्याशिवाय, मध्यप्रदेश विधानसभेत भाजपची स्थिती आणखी मजबूत झाली आहे.
एकूण 230 संख्याबळ असणाऱ्या विधानसभेत आता भाजपच्या आमदारांची संख्या 130 इतकी झाली आहे. एकमेव आमदाराने भाजपमध्ये प्रवेश केल्याने सपचे विधानसभेत अस्तित्व राहिलेले नाही. बसपचे संख्याबळ घटून एकवर आले आहे. प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या कॉंग्रेसचे मध्यप्रदेशात 96 आमदार आहेत.