गोपेश्वर – बद्रीनाथ मधील राष्ट्रीय महामार्गावर आज दरडी कोसळण्याचे प्रकार घडले. त्या दरडी एका वाहनावर कोसळून त्यात तीन जण ठार झाले आहेत. त्यात एका कनिष्ट अभियंत्याचाहीं समावेश आहे. बद्रीनाथ जवळ चामोली जिल्ह्यातील महामार्गावर सध्या सर्व हवामानाला उपयोगी पडेल असा रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. त्या कामी रस्ता रूंदीकरणाचे काम करणाऱ्या एका पथकावर आज पहाटे या दरडी कोसळल्या. त्यात हे तीन जण ठार झाले आहेत.
दरडींमधून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून त्यांची ओळखही पटली आहे. या प्रकारामुळे या महामार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. तेथे महामार्गालगतच्या डोंगर उतरावर पोकलेन मशिनच्या सहाय्याने रस्ता रूंदी करणाचे काम सुरू असतानाच डोंगरावरील दगड आणि माती मोठ्या प्रमाणात खाली आली.