वाघोलीत तिघांचा तलावामध्ये बुडून मृत्यू

पुणे : वाघोली येथी भैरवनाथ तलावामध्ये तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार भैरवनाथ तलावावर रोहिणी पाटोळे (३५) कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या.

रोहिणी पाटोळे या मुलगा स्वप्नीलही त्यांच्या सोबत होता. रोहिणी कपडे धुत असताना, मुलगा स्वप्निल पाण्यात पडला त्याला वाचविण्यासाठी रोहिणी यांनी पाण्यात उडी घेतली पण दोघेही पाण्यात बुडाले. रोहिणी संजय पाटोळे (३५), स्वप्नील संजय पाटोळे (१२) आणि दत्तात्रय रघुनाथ जाधव (३७) अशी मृतांची नावे आहेत.

दरम्यान रस्त्याने जाणारे दत्तात्रय जाधव यांना तलावात दोघे बुडताना दिसताच त्यांनी तलावात उडी घेऊन त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले. मात्र या घटनेत तिघांचाही बुडून मृत्यू झाला. दत्तात्रय जाधव यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला असून दोघांच्या मृतदेहाचा शोध सुरु आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.