बांगलादेशी समजून 200 घरावर फिरवला बुलडोझर

नवी दिल्ली : करीममान अग्रहरा परिसरात अवैध बांगलादेशी राहत असल्यावरून 18 जानेवारी रोजी सुमारे 200 कच्चे घरे जमीनदोस्त केली गेली. येथे अवैध बांगलादेशी राहत असल्यावरून हि कारवाई करण्यात आली. या परिसरातील वीज आणि पाणीपुरवठाही बंद करण्यात आला आहे.

येथील रहिवाशी मोहम्मद जहांगीर हुसेन म्हणतात की,  मी त्रिपुराचा रहिवासी आहे. घर पाडण्यापूर्वी आम्हाला नोटीसदेखील देण्यात आली नव्हती. आम्ही बांगलादेशी नाही. आम्ही गरीब लोक आहोत, आम्ही भाड्याच्या घरात राहू शकत नाही, म्हणून आम्ही येथे राहतो. माझ्याकडे सर्व कायदेशीर कागदपत्रे आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.