प्रवीण माने यांची माहिती : विविध कामांसाठी तरतूद
रेडा- पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात नव्याने रस्ते करणे, दुरुस्ती, सभामंडप बांधणी व सुशोभीकरण कामासाठी तीन कोटी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी दिली.
मंजूर झालेले विकासकामे व निधी- रुई धाकटे पंढरपूर येथे सभागृह व स्वागत कमान- 16 लाख. 10 लाखांची प्रस्तावित विकासकामे- कळंब गावातील विश्वासराव रणसिंग विद्यालय येथे सभागृह बांधणे 10 लाख. शेटफळगढे येथील नागेश्वर मंदिर सभामंडप, निमगाव केतकी येथे व्यायामशाळा बांधणे, वरकुटे येथे भैरवनाथ मंदिराजवळ व्यायामशाळा बांधणे, रूईतील रस्त्याचे खडीकरण करणे, लोणी देवकरमध्ये रस्ता करणे, हिंगणगावमधील पाटील वस्ती येथे रस्ता व पूल उभारणे, भिगवणमधील जैन मंदिराचे सुशोभीकरण व रूई गावात तलाव बांधणे.
डाळज नंबर 1 येथे पेव्हिंग ब्लॉक करणे आठ लाख, अकोले गावात भगवानबाबा मंदिराचे सुशोभीकरण- सात लाख. पाच लाखांची विकासकामे – म्हसोबाचीवाडी अण्णाभाऊ साठे सभागृह बांधणे, कालठण नंबर एक अण्णाभाऊ साठे समाज मंदिर बांधणे, अजोती तुळजाभवानी मंदिरासाठी सभामंडप, भोडणी-खाडे वस्ती येथील कालव्यावर पूल बांधणे, भगत वस्तीत सभामंडप, लावंड वस्ती येथे सुशोभीकरण, बाबीर विद्यालयास पेंव्हिंग ब्लॉक बसविणे, महादेव मंदिर सभामंडप, पळसदेव मशिद सुधारणा करणे, चिंधा देवी मारुती मंदिर सभामंडप, डाळज नंबर 3 स्वागत कमान, बावडा संत सेना महाराज मंदिरात सभामंडप, बाबुळगाव लक्ष्मीआई मंदिरात सभामंडप, हिंगणगाव भवानी माता मंदिरात सभामंडप, आनंदनगर व्यायाम शाळा, अमरावती वस्ती मारुती मंदिर सभामंडप, पंचायत समितीत सुशोभीकरण, निमगाव केतकी खराडे वस्ती येथे गणपती मंदिर सभामंडप. चार लाखांची कामे- पळसदेव जानाई मंदिर सुशोभीकरण, शिरसोडी विघ्नहर्ता व्यायाम शाळा विठ्ठलवाडी सुशोभीकरण.
तीन लाखांची विकासकामे- न्हावीगाव गोर वस्तीमध्ये पेंव्हिंग ब्लॉक, शिंदेवाडी संत सावतामाळी मंदिर सुशोभीकरण, नरुटेवाडी चौक सुधारणा, बावडा गायकवाड वस्तीत मुरमीकरण, अंथुर्णे- काळभैरवनाथ मंदिरास पेंव्हिंग ब्लॉक बसविणे,न्हावीगावात लक्ष्मी मंदिर सुशोभीकरण, भिगवण विद्यालयात शौचालय उभारणे, रुई लावंड वस्तीत मुरमीकरण, शेळगाव ते काळेवाडी रस्ता सुशोभीकरण, करेवाडी काळुबाई मंदिर सभामंडप, चाकाटी ते रेडणी रस्ता मुरुमीकरण, आडाचीवाडी शरद संकुल दुरुस्ती, पिंगारी संरक्षक भिंत बांधणे, शेटफळगढे रस्ता दुरुस्ती. अजोती सत्संग भवन सुशोभीकरण, शिरसाटवाडी देवकाते वस्ती सभामंडप, न्हावी पिरसाहेब सभामंडप, रूई लक्ष्मीआई सभामंडप, अकोले रस्ता मुरुमीकरण, शेटफळगढे रस्ता बनविणे, सराफवाडी रस्ता दुरुस्ती, रुई बाबीर विद्यालयात सांस्कृतिक स्टेज बांधणे, डाळज नंबर 1 स्मशानभूमीसाठी रस्ता करणे.