हैदराबाद – टिपु सुलतानाचा 100 फूट उंच पुतळा उभारण्याची घोषणा कॉंग्रेसचे आमदार तनवीर सैत यांनी केली असून त्यानंतर त्यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सैत यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. माजी मंत्री आणि नरसिंहराजा मतदारसंघाचे आमदार असलेल्या सैत यांनी आपण टिपु सुलतान यांचा 100 फुटी पुतळा उभारणार असल्याचे गुरूवारी जाहीर केले होते. हा पुतळा खऱ्या इतिहासाचे प्रतिक असेल असा दावा त्यांनी केला होता.
“कोश्यारी नावाचं पार्सल…”, राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मनसेकडून पहिली प्रतिक्रिया
सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने इतिहासाची मोडतोड केली असल्याचेही सैत यांचे म्हणणे आहे. दरम्यान, त्यांच्या या घोषणेनंतर त्यांना बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याने जाहीर धमकी दिली असून ही धमकी सोशल मीडियावरही व्हायरल करण्यात आली आहे. रघु असे नाव असलेला कार्यकर्ता ही धमकी देत असून 100 फुट काय 1 फुटाचा पुतळा उभारण्याचा प्रयत्न जरी केला तर तुमची ही अंतिम यात्रा असेल असे सैत यांना बजावण्यात आले आहे. या प्रकारानंतर सैत यांनी पोलीस स्टेशन गाठून गुन्हा दाखल केला आहे.
“कोश्यारी नावाचं पार्सल…”, राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मनसेकडून पहिली प्रतिक्रिया
दरम्यान, याबाबत बोलताना सैत म्हणाले की टिपु सुलतान यांनी ब्रिटिशांविरूध्द लढा दिला. मात्र त्यांची बदनामी करण्याचा अजेंडा भारतीय जनता पार्टी आणि संघ परिवाराकडून सातत्याने राबवला जातो आहे. इस्लामध्ये पुतळ्यांना मान्यता नाही. मात्र खऱ्या इतिहासाचे प्रतिक म्हणून या पुतळ्याची गरज आहे.