चेन्नई – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरीही भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. याचा साक्षात्कार एम. ए. चिदंबरम स्टेडियवर पाहायला मिळाला. चेन्नई सुपर किंग्जच्या (सीएसके) सराव सत्रात सराव करण्यासाठी धोनी ड्रेसिंग रुममधून मैदानात अवतरला व केवळ आपल्या लाडक्या खेळाडूची एक झलक पाहण्यासाठी हजारो चाहते मैदानात उपस्थित होते. सीमारेषा ओलांडून धोनी खेळपट्टीकडे येत असताना चाहत्यांनी माही माही असा गजर केला व एक क्षण धोनीही अवाक झाला. कारण हा कोणताही सामना नव्हता तर तो केवळ सरावासाठी बाहेर आला होता.
यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या 16 व्या मोसमाला येत्या शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेचा सलामीचा सामना धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई व हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स यांच्यात होत आहे. चेन्नईचा संघ एम. ए. चिदंबरम या आपल्या घरच्याच मैदानावर सामना खेळणार आहे.
Nayagan meendum varaar… 💛🥳#WhistlePodu #Anbuden 🦁 pic.twitter.com/3wQb1Zxppe
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 27, 2023
या स्पर्धेतील दहा संघात सर्वात जास्त लोकप्रिय संघ आहेत. ते रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स व धोनीचा चेन्नई, त्यामुळे सामना पाहण्यासाठीच नव्हे तर धोनीचा सराव पाहण्यासाठी आजही हजारो चाहते गर्दी करतात. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मैदानात येत असताना ज्या प्रकारे चाहते सचिन सचिनचा जयघोष करायचे, तेच चित्र धोनीबाबतही सातत्याने दिसून येते.
#IPL2023 : “श्रीलंकेच्या खेळाडूंवर आयपीएलमध्ये…”; BCCI ने केला खुलासा
धोनीची अखेरची स्पर्धा ठरणार…
धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघाने या स्पर्धेत चार वेळा विजेतेपद पटकावले आहे. गेल्या मोसमात धोनीने रवींद्र जडेजाकडे नेतृत्व सोपवले होते. मात्र, त्यांना अपयश आल्याने पुन्हा एकदा धोनीने सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. ही स्पर्धा कदाचित एक खेळाडू म्हणून धोनीची अखेरची स्पर्धा असेल व पुढील स्पर्धेपासून इंग्लंडचा बेन स्टोक्स चेन्नईचे नेतृत्व करेल, असे संकेत मिळत आहेत.