जळोची – देशात सर्वाधिक मोठ्या प्रमाणात दिवाळी हा सण साजरा केला जातो. सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा आदी विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती कुटुंब व संस्थान बरोबरच राजकीय क्षेत्रातील विविध दिग्गज नेते मंडळी व कुटुंबियांकडूनही दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. असे म्हणतात की, राज्याचे व देशाचे राजकारण ज्यांच्याभोवती फिरते असे दिग्गज नेते शरदचंद्रजी पवार व पवार कुटुंबियांकडून बारामती येथे साजरा केला जाणारा दिवाळी, पाडवा वैशिष्ट्यपूर्ण असतो… पवार कुटुंबीयांना विशेषतः पवार साहेबांना भेटण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच इतर राज्यातील अनेक नागरिक भेटण्यासाठी येत असतात..
दिवाळी पाडव्यानिमित्त बारामती येथील गोविंद बाग या निवासस्थानी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, विरोधी पक्ष नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांच्यासह सर्व पवार कुटुंबीय या दिवशी प्रत्येकाला भेटतात. भेटीला येणाऱ्या नागरिकांच्या इच्छेखातरते प्रत्येकाशी फोटो ही काढतात.
देशाच्या सर्वेच्च नेत्याला जवळून पाहण्याची व त्यांच्याशी हस्तांदोलन करण्याची सुवर्ण संधी म्हणजे दिवाळीचा पाडवा. म्हणूनच मागील अनेक वर्षापासून पवार साहेबांना व पवार कुटुंबियांना भेटण्यासाठी राज्याच्या कान्याकोप-यातून हजारो लोक गोविंद बागेत येत असतात. त्या प्रत्येकाला पवार साहेबांना भेटण्यासाठी हा खास दिवस असतो.
या दिवशी सर्वसामान्यांसह सगे सोयरे, वेगवेगळ्या पक्षातील नेते,कार्यकर्ते त्यांना भेटायला आवर्जून येत असतात. हा दिवस खास त्यांच्यासाठी पवार कुटुंबिय देत असतात. राज्याच्या कान्याकोप-यातून आलेल्या नागरिकांना आज सकाळपासूनच पवार साहेब व कुटुंबिय नागरिकांच्या भेटी घेत आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून चालू असलेल्या परंपरेला पवार प्रेमी ही भरभरुन प्रतिसाद देत असून यंदाही मोठ्या संख्येने पवार प्रेमीं भेटण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. या एका दिवसात हजारो कार्यकर्ते व लहान थोरांसह अबालवृध्द गोविंद बागेत येत असतात.