जे टिकून राहिले, त्यांना चांगला परतावा मिळण्याचे दिवस (भाग-२)

जे टिकून राहिले, त्यांना चांगला परतावा मिळण्याचे दिवस (भाग-१)

प्रश्न – जर माझ्या एक वर्षाच्या एसआयपीचा परतावा कमी झाला असेल तर माझी गुतंवणूक योजना बदलण्याची गरज आहे का?
उत्तर – प्रत्यक्षात एक वर्ष हा कालावधी एसआयपी गुंतवणुकीसाठी छोटा आहे. कोणत्याही योजनेचा परामर्श घेण्याअगोदर आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मदतीने भविष्यातील उद्दिष्टांसाठी लागणाऱ्या रकमेचे योग्य नियोजन, योग्य योजनेचा पर्याय निवडून केल्या गुंतवणूकदाराने निश्‍चिंत रहावे. योजनेच्या फंड मॅनेजरच्या कामकाजाचा लेखाजोखा तपासण्यासाठी किमान तीन-चार वर्षांचा कालावधी घ्यायला हवा. जर या काळात सातत्याने फंडाच्या परताव्यामध्ये घट होताना दिसत असल्यास अशा योजनांमध्ये बदल करणे हिताचे ठरेल.

प्रश्न – किती काळासाठी एसआयपी सुरु ठेवावी?
उत्तर – कोणतीही एसआयपी सुरु करत असताना ती नेहमीच दीर्घकालासाठी घ्यावी. किमान तीन, पाच किंवा दहा वर्षांच्या कालावधीसाठी एसआयपीमध्ये चक्रवाढ पद्धतीच्या परताव्याचा संपूर्ण फायदा घेता येतो. सध्या सर्व म्युच्युअल फंडाच्या योजना पर्पेच्युअल एसआयपी हा पर्याय उपलब्ध करून देत आहेत. या पर्यायामध्ये जो पर्यंत गुंतवणूकदार गुंतवणूक बंद करण्याची सूचना देत नाही तोपर्यंत सदर योजनेमध्ये पैसे गुंतवणे सुरुच राहते. बहुतांशी आर्थिक सल्लागार गुंतवणूकदारांना त्यांच्या प्रत्येक एसआयपीला कोणते तरी आर्थिक उद्दिष्ट जोडलेले असल्यामुळे उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत एसआयपी सुरुच ठेवण्यास सांगत असतात.

प्रश्न – माझ्या एसआयपी रकमेमध्ये वाढ करू शकतो का?
उत्तर – नोकरदार मंडळी गुंतवणूक करत असताना भविष्यातील पगारवाढीमुळे होणाऱ्या वाढीव पैशाचा वापर एसआयपी गुंतवणुकीत वाढ करण्यासाठी करात येऊ शकतो. सध्या प्रत्येक म्युच्युअल फंड योजना टॉप अप ही सुविधा गुंतवणूकदारांना देत आहेत. याचा वापर गुंतवणूकदारांनी अवश्‍य करावा. जेणेकरून आर्थिक उद्दिष्ट ठरलेल्या वेळेच्या आधी साध्य करणे शक्‍य होते.

प्रश्न – माझ्या सुरु असणाऱ्या एसआयपीमध्ये एकरकमी गुंतवणूक करावी का?
उत्तर – गुंतवणुकदाराच्या सुरु असलेल्या एसआयपीमध्ये एकरकमी गुंतवणूक करावी हा अतिशय फायद्याचा विचार आहे. कारण शेअरबाजारात काही कारणाने घट झाल्यास या संधीचा वापर एकरकमी गुंतवणूक करण्यासाठी अवश्‍य घ्यावा व आपले आर्थिक उद्दिष्टही वेळेच्या आधी पूर्ण करणे हे यामुळे शक्‍य होते. अर्थात, बाजार खाली असताना अशी गुंतवणूक करणे अपेक्षित आहे. ते आपल्याला ठरविता येईलच, असे नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)