पुणे- शहरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये जाब विचारणाऱ्या व्यक्तींना कुऱ्हाड आणि चॉपरने डोक्यात घाव घालून जखमी करण्यात आले. याप्रकरणी विश्रांतवाडी व हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
अक्षयसिंग दिलबागसिंग शेरगिल(30) यांनी दिलेल्या तक्रारीनूसार विश्रांतवाडी पोलिसांनी सराईत गुन्हेगार संतोष उर्फ बंटी सुखदेव सिंग बदन(रा.आदर्शनगर, येवरडा) याला अटक केली आहे.
अक्षयसिंगच्या शेजारी संतोष हा रहातो, तो सराईत गुन्हेगार आहे. संतोष हा रात्री मोठ्याने गाणी लावत असल्यामुळे अक्षयसिंगच्या बहिणीने त्याला गाणी लावत जाऊ नकोस असे सांगितले होते. याचा राग मनात धरुन संतोषने तीला शिवीगाळ केली होती.
याचा जाब विचारण्यासाठी अक्षयसिंग संतोषच्या घरी गेला होता. याचा राग मनात येऊन संतोषसिंगने अक्षयसिंगच्या तोंडावर घरातील कुऱ्हाडीने वार केले. यामध्ये अक्षयसिंग गंभीर जखमी झाला. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सातपुते करत आहेत.