“पती, पत्नी और वो’ ची प्रगती पाहता हा सिनेमा हिट ठरणार असे संकेत मिळायला लागले आहेत. तसे झाले तर भूमी पेडणेकरच्या नावावर यावर्षी एक हिट सिनेमांची हॅटट्रीक जमा होण्याची शक्यता आहे. एका वर्षात लागोपाठ तीन हिट सिनेमे देणाऱ्या फारच थोड्या कलाकारांमध्ये भूमी पेडणेकरची गणना केली जाऊ शकते. “पती, पत्नी और वो’ ला 9 ते 10 कोटी रुपयांचे ओपनिंग मिळू शकेल, असा अंदाज आहे. भूमीच्या यापूर्वीच्या “बाला’मध्ये तिने एका सावळ्या मुलीचा रोल केला होता.
भारतीय मानसिकतेमध्ये गोऱ्या वर्णाला किती अनावश्यक मान दिला जातो, हे दर्शवणाऱ्या या सिनेमालाही चांगले यश मिळाले होते. तापसी पन्नूबरोबरच्या “सांड की आंख’ची स्पर्धा “हाऊसफुल्ल 4′ आणि “मेड इन चायना’बरोबर होती. तरिही या सिनेमाने चांगले यश मिळवले होते.
एका वर्षात असे वेगवेगळे रोल करायला मिळणे आणि त्यातही चांगले हिट सिनेमे मिळणे खूपच भाग्याचे आहे. आता “पती, पत्नी और वो’लाही असेच चांगले यश मिळणे अपेक्षित आहे. इतका चांगला प्रतिसाद केवळ प्रेक्षकांमुळेच मिळाला असल्याचे भूमी म्हणाली.