मुंबई – भाजपचे नेते नारायण राणे नेहमीच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करत असतात. अशात खासदार संजय राऊत यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अजित पवार नारायण राणे यांच्यावर टीका करत असतानाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओसोबत त्यांनी एक ट्वीटही केलं आहे.
दादा म्हणजे कमाल आहे.
कमाल की चीज!
नेता असाच असतो एकदम मोकळा ढाकळा!
सहज सोप्या भाषेत थेट संदेश!
जय महाराष्ट्र! https://t.co/DnjCD4lCZl— Sanjay Raut (@rautsanjay61) February 24, 2023
या व्हिडीओमध्ये अजित पवार म्हणतात, “नारायण राणेंनी शिवसेना फोडली तर सगळे पडले की नाही. नारायण राणे तर दोनदा पडले. एकदा कोकणात आणि दुसरीकडे वांद्र्यात का कुठे उभे होते. तिथेही पडले. तिथे तर महिलेने पाडलं…बाईनं पाडलं. ही त्यांची, प्रत्येकाची काय परिस्थिती आहे. ”
दरम्यान, संजय राऊत म्हणतात, “दादा म्हणजे कमाल आहे. कमाल की चीज! नेता असाच असतो एकदम मोकळा ढाकळा! सहज सोप्या भाषेत थेट संदेश! जय महाराष्ट्र!” या ट्वीटवर अनेक जणांनी प्रतिक्रिया दिली आहे. काही जणांनी सामनामधला जुना लेख शेअर केला आहे. ज्यामध्ये अजित पवारांचा उल्लेख पळपुटा असा केला आहे. याच लेखावरुन युजर्स कमेंट्स करू लागले आहेत.