सिडनी : समुद्रात अनेक चमत्कारिक आणि रहस्यमय प्राणी आढळतात. याशिवाय विविध प्रकारच्या वनस्पती आणि इतर गोष्टीही महासागरांमध्ये आढळतात. समुद्रातील सर्व घडामोडींवर लक्ष ठेवणारे जीवशास्त्रज्ञ दररोज रहस्यमय प्राण्यांचा शोध घेतात. आता ऑस्ट्रेलियात एक रहस्यमय प्राणी सापडला आहे. सिडनीच्या समुद्रकिनाऱ्यावर हा प्राणी सापडला असून, त्यानंतर खळबळ उडाली आहे. दिसायला अगदी विचित्र असणारा हा प्राणी मृतावस्थेत सापडला आहे.
समुद्रकिनारी फिरणाऱ्या लोकांनी हा प्राणी पाहिल्यावर लोक घाबरले आणि त्याच्या जवळ जायलाही घाबरू लागले. अनेक तास उलटून गेल्यानंतरही त्या प्राण्यात काहीच हालचाल होत नसल्याचे लोकांनी पाहिले, म्हणून काही लोक धाडस करून त्याच्याकडे गेले. तेव्हा त्यांनी पाहिलं की त्या प्राण्यांच्या पाठीवर सागरी वनस्पती वाढत आहेत. सागरी शास्त्रज्ञ आणि स्थानिकांनी सांगितले की त्यांनी असा प्राणी यापूर्वी कधीही पाहिला नव्हता.
हा गूढ प्राणी खोल पाण्यात राहत असून, जोरदार लाटांमध्ये अडकल्याने तो समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचला असल्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. सिडनीतील ग्रीनहिल्स बीचवर लोकांनी हा प्राणी पाहिला होता, असे एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. तिथे राहणाऱ्या विकी हॅन्सनने याबाबत मीडियाशी संवाद साधला आहे. शनिवारी सकाळी आपल्या कुत्र्याला फिरवायला नेत असताना हा प्राणी दिसल्याचे त्यांनी सांगितले. त्याने सांगितले की, सुरुवातीला त्याला या प्राण्याजवळ जायला भीती वाटत होती. कारण या प्राण्याच्या शरीराची रचना अतिशय विचित्र होती.
एका स्थानिक महिलेने हा रहस्यमय प्राणी समुद्रकिनारी फिरताना पाहिल्याचा दावा केला आहे. ती म्हणाली की हा एक भयानक प्राणी आहे. समुद्रात येणारी भरती या जीवाला वाहून नेईल, अशी शंका त्या महिलेस आली. ग्रीनहिल्स बीचवर या प्राण्याला पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. लोक आश्चर्यचकित होऊन म्हणतात की त्यांनी असा प्राणी कधीच पाहिला नव्हता.
ऑस्ट्रेलियाच्या सागरी शास्त्रज्ञांनी हा प्राणी आपल्याजवळ ठेवला आहे. त्याला आता या प्राण्याच्या प्रजातींची माहिती मिळणार आहे. याशिवाय या प्राण्याचा मृत्यू कसा झाला यावर शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. याआधीही जीवशास्त्रज्ञांनी समुद्रात अनेक रहस्यमय जीव शोधून काढले आहेत, जे पाहून ते थक्क झाले होते.