आमच्या निकालाशी खेळू नका; तुमच्या सरकारला निकालाची भूमिका सांगा, सॉलिसिटर जनरल यांनाही सुनावले
नवी दिल्ली : कॉग्रेसचे नेते डी, के. शिवकुमार यांना जामीन देण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी सर्वोच्च न्यायलयाची याचिका सर्वोच्च न्यायलयाने फेटाळून लावली. यावेळी न्यालयाने इडी आणि सॉलिसिटर जनरला तुषार मेहता यांचीही चांगलीच कानउघडणी केली.
ही याचिका म्हणजे पी. चिदंबरम यांच्या विरोधातील याचिकेची कॉपी पेस्ट आहे. शिवकुमार यांचा उल्लेख माजी गृहमंत्री म्हणून केला आहे. एखाद्या नागरिकाशी ही वागण्याची पध्दत नाही. सरकार आमच्या निवाड्याशी खेळू शकत नाही. शबरीमला प्रकरणात आमचा निर्णय कृपया वाचा. आमच्या निकालाशी तुम्ही खेळ करू शकत नाही. तुमच्या सरकारला आमच्या निकालाची भूमिका सांगा; अशा शब्दात न्या. आर. एफ. नरीमन आणि एस. रविंद्र भट यांच्या खंडपीठाने अंमलबजावणी संचनालय आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना फटकारले.
पी. चिदंबरम यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेतील मजकूर कॉपी पेस्ट केला असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. शिवकुमार यांच्या यांना 23 ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर केला होता. त्यांना तीन सप्टेंबर रोजी अंमलबजावणी संचनालयाने अटक केली होती. स्थानिक न्यायलयाने त्यांना जामीन नाकरल्यानंतयर त्यांना न्यायलयतीन कोठडीत ठेवण्यात आले होते. तपास यंत्रणांच्या ताब्यात असणाऱ्या कागदोपत्री पुराव्यात बदल करू नये, अशी अट न्यायालयाने शिवकुमार यांना घातली होती. शिवकुमार हे कॉंग्रेसचे सातवेळा निवडून आलेले आमदार आहेत. त्यांना मनी लॉंड्रींग कायद्याखाली अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर प्रप्तीकर विभागाने कोट्यवधी रुपयांचा हवाला व्यवहार केल्याचा आरोप ठेवला होता. या आरोपाच्या आधारे अंमलबजावणी संचनालयाने त्यांच्यावर गुन्हा नोंदवला होता.