मोदींचा पराभव करावाच लागेल, असे का म्हटली चिमुकली पाहाच

नवी दिल्ली: काळ बदलत चालला आहे तशी शिक्षण पद्धतही बदलायला हवी. पण अजूनही बहुतांश ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं विद्यार्थ्यांना शिकवलं जात आहे. त्यातच पालकही त्यांच्या काळातील दोषपूर्ण शिक्षण पद्धतीनुसारच मुलांवर दबाव टाकतात. यावरच एका चिमुरडीने शिक्षण व्यवस्थेवर तीव्र संताप व्यक्त करत प्रश्न उपस्थित केले आहेत. या चिमुरडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये चिमुरडी म्हणते, शाळेसाठी सकाळी ६ वाजता उठवले जाते. ब्रश करायला लागतो. पाणी प्यायला लागते. तसेच पटापट दूध प्यायला लागते. आणि तयार होऊन पळत शाळेत जावे लावे लागते. स्कुलबस असल्यावर त्यात बसा आणि शाळेत जा. तासन तास गणित, इंग्लिश आणि गुजराती शिका. आणि पुन्हा पूर्ण महिना जीके (जनरल क्नॉलेज) शिका.

शाळा बनवणारा व्यक्ती तुला भेटला तर तू काय करशील या प्रश्नावर चिमुरडी म्हणाली, मी त्याला पाण्यात टाकेल, त्यावर इस्त्री फिरवेल. एवढ्यावरच न थांबता ती पुढे म्हणाली, देवाने जर सगळे सुंदर बनवले तर शिक्षणही चांगले बनवायला पाहिजे होते. म्हणजे शिकण्यास मजा आली असती.

याचवेळी एका व्यक्तीने तीला पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल विचारले असता ती म्हणाली, मोदींना एकदा तरी पराभव करावाच लागेल. शेवटी तीने शाळेला एका महिन्यासाठी सुट्ट्या पाहिजे, अशी मागणी ती चिमुरडी व्हिडीओ करताना दिसत आहे.

दरम्यान, शिक्षणक्षेत्रात मुले एकमेकांची स्पर्धक म्हणून अधिक वावरतात. या नादात त्यांचे बालपण हिरावले जाते का? याचा विचार आपण करायला पाहिजे.

Leave A Reply

Your email address will not be published.