मलायका नसून ही व्यक्ती आहे अर्जुन कपूरच्या आयुष्यातील ‘हुकूमी एक्का’; हातावर गोंदवला टॅटू

मुंबई – बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर हा अभिनेत्री मलायका अरोरासोबत रिलेशनमध्ये आहे. बॉलिवूडमधील हे कपल कायम चर्चेत असते. ते दोघं लग्न करणार असल्याच्या अफवाही अनेकदा उठल्या आहेत.

दरम्यान, आता अर्जुन कपूरच्या एका फोटोमुळे पुन्हा यांच्या नात्याची चर्चा रंगू लागली आहे. याचं कारण म्हणजे अर्जुनने आपल्या सोशल मीडियावर शेअर केलेला एक व्हिडिओ.

अर्जुन कपूरने आपल्या इन्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्याच्या हातावर  एक टॅटू दिसत आहे. हा टॅटू A नावाचा आहे. A हे अर्जुनच्या नावाचं पहिलं अक्षर असलं तरी अर्जुनने हा टॅटू एका खास व्यक्तीसाठी काढला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

अर्जुन कपूरनं आपल्या डाव्या हाताच्या मनगटावर हा टॅटू काढला आहे. ‘ए’ हे इंग्रजी अक्षर आणि त्याखाली पत्त्यातील हुकुमाचा एक्का मानल्या जाणाऱ्या इस्पिक एक्क्याचे चिन्ह आहे. हा टॅटू दर्शवणारा एक व्हिडिओ त्यानं नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

सध्या अर्जुनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अर्जुन कपूरने हा टॅटू आपली बहिण ‘अंशुला’साठी काढला असून, त्याने एक खास संदेशही दिला आहे. “ती माझ्यासाठी खूपच सामर्थ्यवान आहे. अंशुला आणि मी आयुष्यात आणि ‘ए’ या अक्षराद्वारे नावातही जोडले गेलो आहोत’.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.