सातारा (प्रतिनिधी): सातारा तालुक्यातील पाडळी येथे शिकारी साठी गेलेल्या तेरा जणांना वनविभागाने पकडले आहे. या शिका-यांकडून शिकारीसाठी वापरण्यात येणारे साहित्य, वाघर, लाठी , काठ्या, दुचाकी, छोटा हत्ती असा चार लाख 46 हजार 200 रुपयाचा मुद्देमाल वनविभागाने ताब्यात घेतला आहे.
सातार्याच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल राठोड यांनी ही कारवाई केली. दत्तात्रय विजय पाटील (रा हरपळवाडी, ता कराड), आकाश रमेश आवळे, तुषार अंकुश काळे, श्रीमंत रामचंद्र गायकवाड,गणेश दादा चव्हाण (सर्व रा.अतीत, ता. सातारा), अमर राजकुमार काळे, मंगेश संजय जाधव, चैतन्य सुनील काळे, सोमनाथ एकनाथ काळे (सर्व रा नागठाणे,ता. सातारा), विशाल बबन भिंगारे, सयाजी भिकू मदने (दोघे रा इंदोली, ता. कराड), अजित श्रीरंग जाधव (रा. किवळ, ता. कराड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाडळी येथे काही युवक शिकारीसाठी आले असल्याची माहीती वनविभागाला मिळाली होती. यानंतर, तातडीने राठोड यांनी आपले सहकारी योगेश गावीत, सुहास भोसले, राज मोसलगी, महेश सोनवणे, रणजित काकडे, संतोष काळे, मारुती माने यांच्यासह पाडळी येथे धाव घेतली आणि एका छोटा हत्ती गाडी मधून शिकारीसाठी जात असलेल्या या टोळीची झडती घेतली असता, त्यांच्याकडून शिकारीसाठी लागणारी वाघर, काठी,दुचाकी असे दोन लाख 44 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.