तुम्ही जर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाली हॅचबॅक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि कोणती कार घ्यावी? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ही माहिती तुमच्या उपयोगाची आहे. आम्ही तुम्हाला 5 अशा ऑटोमॅटिक हॅचबॅक कार्सबद्दल माहिती देणार आहोत, ज्या कमी बजेटमध्ये खरेदी करता येतील. यामध्ये ह्युंदाई सँट्रो, मारुती सुझुकी वॅगन आर, डॅट्सन गो, मारुती सुझुकी एस प्रेसो आणि टाटा टियागो या कार्सचा समावेश आहे. चला तर मग या पाच कार्सबद्दलची माहिती जाणून घेऊया.
१. ह्युंदाई सँट्रो
ह्युंदाई सँट्रो कार 69hp, 1.1-लीटर पेट्रोल इंजिनसह सादर करण्यात आलेली उत्तम कार आहे. या कारची किंमत 5.63 लाख रुपये ते 6.35 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. ही कार 20.3 किलोमीटर प्रतिलीटर इतकं मायलेज देते.
२. मारुती सुझुकी वॅगन आर
या कारमध्ये 1.2 लीटर क्षमतेचे 4 सिलेंडर इंजिन आहे, ज्यामुळे 82 Bhp पावर आणि 113 Nm चा टॉर्क जनरेट होऊ शकते. यामध्ये 5 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमेटिक गिअरबॉक्स आहे. ही कार हायब्रिड पावरट्रेनसह सादर करण्यात आलेली आहे. ही कार 21.79 किलोमीटर प्रतिलीटर इतकं मायलेज देते. 1 लीटर इंजिन व्हेरिअंटमध्ये नवीन वॅगन आरची किंमत 5.48 लाख रुपये ते 6.18 लाख रुपयांपर्यंत आहे. तसेच 1.2 लीटर व्हेरिअंटमध्ये या कारची किंमत 5.89 लाख रुपये ते 6.69 लाख रुपयापर्यंत आहे. नवीन वॅगन आर हार्टटेक प्लॅटफॉर्मवर विकसित आणि तयार करण्यात आली आहे. हा प्लॅटफॉर्म सेफ्टी नियमांना अनुरुप आहे. नव्या कारमध्ये बोल्ड डिझाईन, मोठी केबिन आहे.
३. डॅट्सन गो
डॅट्सन गो ही सीव्हीटी ऑटोमॅटिकसह भारतातील सर्वात स्वस्त हॅचबॅक कार आहे. ही कार 77hp, 1.2-लिटर इंजिनसह येते. तथापि, गुणवत्तेच्या बाबतीत ही कार अद्याप तिच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा मागे आहे. प्लस साइडमध्ये, गो सीव्हीटी ही इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोलसह भारतात उपलब्ध असलेली सर्वात स्वस्त कार आहे. डॅटसन गो या कारची किंमत 6.31 लाख रुपये ते 6.51 लाख रुपये इतकी आहे. ही कार 19.59 किलोमीटर प्रतिलीटर इतकं मायलेज देते.
४. मारुती सुझुकी एस प्रेसो
मारुती एस-प्रेसोची किंमत 4.8 लाखांपासून ते 5.8 लाख रुपयांपर्यंत आहे. ही छोटी एसयूव्ही Standard, LXI, VXI आणि VXI+ या चार व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. एस प्रेसोमध्ये 10 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्स देण्यात आल्याचे कंपनीने सांगितले आहे. ईबीडीसह एबीएस, ड्रायव्हर साइड एअरबॅग्स, रिअर पार्किंग सेन्सर्स, सीट बेल्ट रिमाइंडर आणि स्पीड अलर्ट सिस्टम असे फीचर्स यामध्ये आहेत. या कारमध्ये मोठी केबिन देण्यात आली आहे. तसेच ही कार 68hp, 1.0-लीटर पेट्रोल इंजिन आणि 5 स्पीड AMT गियरबॉक्ससह येते. एस-प्रेसो 21.7 किलोमीटर प्रतिलीटर इतकं मायलेज देते.
५. टाटा टियागो
ही एक उत्तम हॅचबॅक कार आहे. गेल्या काही वर्षांपासून या कारचा भारतीय बाजारात चांगलाच दबदबा आहे. टियागोमध्ये 14 इंचांचे एलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. रेग्युलर ट्रिमशिवाय टियागो लिमिटेड एडिशनमध्ये रियर पार्सल ट्रे आणि वॉईस कमांड सिस्टिमसह पाच इंचांची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम देण्यात आली आहे. अडंर द हुड गाडीत 1.2 लीटरचं रेवोट्रॉन पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. जे 85 bhp पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करतं. याची मोटर 5 स्पीड मॅनुअल युनिटद्वारे जबरदस्त पॉवर देते. ही कार 23.84 किलोमीटर प्रतिलीटर इतकं मायलेज देते.