Most Sixes In IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये संघ सातत्याने मोठी धावसंख्या बनवत आहेत. पण या मोसमात आतापर्यंत सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कोणाचा समावेश आहे हे तुम्हाला माहिती आहे का?
1. Heinrich Klaasen : या मोसमात आतापर्यंत सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज हेन्री क्लासेनने सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. हेन्री क्लासेनने 6 सामन्यात 24 षटकार मारले आहेत.
2. Sunil Narine : कोलकाता नाईट रायडर्सच्या सुनील नरेनने 6 सामन्यात 20 षटकार ठोकले आहेत. तो या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर सुनील नरेनने या मोसमात आतापर्यंत 276 धावा केल्या आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत विराट कोहली आणि रायन पराग यांच्यानंतर सुनील नरेन तिसऱ्या स्थानावर आहे.
3. Riyan Parag : त्याचबरोबर राजस्थान रॉयल्सचा रियान पराग हा देखील या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. रियान परागने 7 सामन्यात 20 षटकार ठोकले आहेत. रियान परागने या मोसमात 318 धावा केल्या आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत विराट कोहलीनंतर रियान पराग दुसऱ्या स्थानावर आहे.
4. Nicholas Pooran : लखनौ सुपर जायंट्सचा फलंदाज निरोलस पुरन सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. निकोलस पुरनने आतापर्यंत 6 सामन्यात 19 षटकार मारले आहेत.
5. Abhishek, Dinesh, Rohit : या यादीत सनराइजर्स हैदराबादचा फलंदाज अभिषेक शर्मा (6 सामने 18 षटकार, आरसीबीचा दिनेश कार्तिक (7 सामने 18) मुंबई इंडियन्सचा फलंदाज रोहित शर्मा (7 सामने 18) हे संयुक्तरित्या पाचव्या स्थानावर आहेत.