एकदिवसीय क्रिकेटच्या चाहत्यांसाठी 2021 हे वर्ष तितके खास नव्हते. यंदा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि टी20 विश्वचषकामुळे एकदिवसीय क्रिकेटकडे बहुतांश आघाडीच्या संघांनी दुर्लक्ष केले.
विशेष म्हणजे, एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ ऑस्ट्रेलियाने या वर्षी केवळ तीन एकदिवसीय सामने खेळले. तर 2011 च्या विश्वचषक विजेत्या भारताने 2021 मध्ये फक्त सहा एकदिवसीय सामने खेळले.
2021 मध्ये फक्त श्रीलंका, बांगलादेश आणि आयर्लंड यांनी दहा पेक्षा जास्त एकदिवसीय सामने खेळले आहेत.
याच पार्श्वभूमीवर यंदा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणार्या 3 फलंदाजांच्या कामगिरीवर नजर:
1. पॉल स्टर्लिंग, आयर्लंड (705 धावा)
आयर्लंडचा अष्टपैलू खेळाडू पॉल स्टर्लिंगने यावर्षी एकदिवसीय क्रिकेटमध्ये कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली. उजव्या हाताच्या फलंदाजाने 14 सामन्यांमध्ये 54.23 च्या सरासरीने 705 धावा केल्या. तसेच यावर्षी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन शतकांची नोंद करणारा आयरिशमन एकमेव फलंदाज आहे. आयर्लंडची यूएसए विरुद्धची मालिका नियोजित वेळेनुसार झाली असती तर तो यावर्षी आणखी काही धावा करू शकला असता.
2. जेनेमन मलान, दक्षिण आफ्रिका (509 धावा)
दक्षिण आफ्रिकेचा उदयोन्मुख फलंदाज जेनेमन मलान या वर्षी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खूप प्रभावशाली ठरला. 25 वर्षीय खेळाडूने केवळ सात डावांत 84.83 च्या शानदार सरासरीने 509 धावा केल्या.
मलानने यावर्षी दक्षिण आफ्रीकेसाठी दोन शतके आणि दोन अर्धशतके झळकावली. 2022 च्या सुरुवातीला होणार्या भारताविरुद्धच्या मालिकेत तो आपला चांगला फॉर्म कायम ठेवण्यास उत्सुक असेल.
3. तमीम इक्बाल, बांग्लादेश (464 धावा)
आशियाई खेळाडूंमध्ये, तमीम इक्बालने 2021 मध्ये सर्वाधिक एकदिवसीय धावा केल्या आहेत. या डावखुर्या फलंदाजाने बांग्लादेशसाठी 12 डावांमध्ये 38.66 च्या सरासरीने 464 धावा केल्या.
इक्बालने वर्षभरात एक शतक आणि चार अर्धशतकांची नोंद केली. विश्वचषक सुपर लीग सुरू असल्याने, बांग्लादेशच्या चाहत्यांना त्यांच्या सलामीवीराकडू अपेक्षा आणखी वाढल्या आहेत.