पुणे – भाजपनेते किरीट सोमय्या मागील अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढण्यात आघाडीवर आहेत. मात्र त्यांच्यावर अनेकदा स्वपक्षातील भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येत होता. त्यातच आज सोमय्या यांना पुण्यात शिवसेनेच्या रोषाला सामोरं जावं लागलं. यावेळी त्यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. आता सोमय्या यांच्या तब्येतीविषयी मोठी अपडेट समोर आली आहे.
महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी सोमय्या महापालिकेत येणार असल्याची माहिती मिळताच मोठ्या संख्येने शिवसैनिक महापालिकेत जमले होते. यावेळी काही समजण्याच्या आतच धक्काबुक्की सुरू झाली. त्यानंतर एवढा गोंधळ झाली की सोमय्या यांचे सुरक्षा रक्षक बाजूला फेकले गेले. त्यानंतर सोमय्या यांना धक्काबुक्की करुन खाली पाडले आणि मारहाण करण्यात आली.
मारहाण झाल्यानंतर सोमय्या यांना संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांनी त्यांच्या तब्येतीविषयी माहिती दिली आहे. सोमय्या यांच्या माकड हाडाला मार लागला आहे. त्यांची स्थिती प्रकृती स्थिर आहे. त्यांचा रक्तदाब वाढला होता. पण आता काळजीचं कारण नसल्याचं डॉक्टरांनी म्हटलं.
दरम्यान माकड हाडाला दुखापत असून त्यांना आरामाची गरज आहे. एक दिवस रुग्णालयात राहावं लागेल. उद्या सुट्टी होईल, असंही डॉक्टरांनी म्हटलं.