नवी दिल्ली – केदारनाथचे दरवाजे उघडल्यानंतर बाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्यांची संख्या वाढते. यासाठी लोक महिनोनमहिने अगोदर बुकिंग करायला लागतात. दरवर्षी एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान लाखो भाविक बाबांच्या दर्शनासाठी येतात. अशात लोकांच्या सोयीसाठी आयआरसीटीसीने हेलिकॉप्टर सुविधा सुरू केली आहे.
Holy Kedarnath dham Yatra, now book your helicopter tickets on IRCTC portal with convenience and ease.
Visit : https://t.co/EYUrym4GYU@incredibleindia @tourismgoi @UTDBofficial pic.twitter.com/r6MdVJ2S6n
— IRCTC (@IRCTCofficial) April 8, 2023
आता लोक हेलिकॉप्टरने केदारनाथचे दर्शन घेऊ शकतात. तुम्हीही यावर्षी केदारनाथला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता. तुम्ही ते कसे आणि कुठून बुक करू शकता जाणून घ्या
असे करा बुकिंग
सर्व प्रथम IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
त्यानंतर येथून http://heliyatra.irctc.co.in वर जा.
तुमच्या चारधाम यात्रेसाठी नोंदणी करा.
हेलिकॉप्टरच्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला नोंदणी करणे अनिवार्य आहे.
तुम्ही सहलीला जाण्यापूर्वी 6 दिवस आधी हेलिकॉप्टर बुक करा.
पोर्टल दररोज दुपारी 12 वाजता उघडते. पोर्टल उघडताच तुम्ही तुमचे बुकिंग करण्याचा प्रयत्न करा.
गुप्तकाशी ते केदारनाथ धाम या हेलिकॉप्टरसाठी तुम्हाला ७,७४४ रुपये मोजावे लागतील.
त्याच वेळी, फाटा ते केदारनाथसाठी 5,500 रुपये आणि सरसी ते केदारनाथसाठी 5,498 रुपये मोजावे लागतील.
या भाड्यात प्रवास आणि वाहतुकीसह प्रत्येक गोष्टीचा खर्च समाविष्ट आहे.