मुंबई – हिंदू सण सामरंभ डीजेविना (dj sound) साजरे करा असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गणेशोत्सवाच्या (ganeshotsav) पार्श्वभूमीवर केले होते. या आवाहनाचे सर्वत्र स्वागतही करण्यात आले. परंतू ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma andhare) यांनी एका बड्या नेत्याच्या घरासमोरून मिरणूक चालली, त्याचा आपल्या नातवाला त्रास होतोय म्हणून हा बडा नेता भाष्य करेल असे वक्तव्य करत राज ठाकरेंना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला होता. (sushma andhare)
अंधारेंच्या या वक्तव्याचा मनसेकडून समाचार घेतल्या जात असून, यापुढे असे वक्तव्य केल्यास कानाजवळ डीजे वाजणार असा इशारा देण्यात आला आहे.(MNS)
मनसे सरचिटणीस आणि राज ठाकरेंच्या वहिनी शालिनी ठाकरे यांनी याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या की, संबंध नसताना जर राज ठाकरेंच्या नातवावर राजकारणासाठी बोललात, तर मनसेची महिला सेना कानाजवळ डीजे वाजवेल असा इशारा शालिनी ठाकरेंनी दिला आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध ठाकरे असा वाद पेटण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला राजकारणात ओढले. मग तुमच्यासारखे चेले-चपाटे तरी कसे मागे राहतील? यातूनच तुमच्या पक्षाची संस्कृती दिसते’ असे शालिनी ठाकरेंनी पत्र लिहित म्हटले आहे. आपल्यालाही एक मुलगी आहे. स्वार्थी राजकारणापोटी तिच्याबाबत कोणी अशी विधाने केली, तर ती तुमच्या मनाला रुचतील का?’ असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.