पुणे – डॉ. पतंगराव कदम संघाने एम.एच. स्पोर्टस् संघावर 40-22 अशी मात करीत जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचे विजेते पद पटकावले. डॉ. पतंगराव कदम संघाच्या श्रतिका भामे, आर्या लवार्डे, रिया लवार्डे व आलिया सय्यद यांनी जोरदार खेळ करीत आपल्या संघावला विजय मिळवून दिला. एम.एच. स्पोर्टस् संघाच्या रिना कुदळे, एकता ननावरे, धनश्री ननावरे यांनी चांगला खेळ केला.
किशोरगट मुलांच्या अंतिम सामन्या श्रीकृष्ण संघाने धर्मवीर कबड्डी संघावर 49-42 अशी मात करीत अंतिम विजेते पद पटकाविले. श्रीकृष्ण संघाच्या अमित कांबळे, विशाल घाघरमाळे व धनंजय कापसे यांनी चौफर हल्ला चढवित आपल्या संघाला विजय मिळवून दिला. धर्मवीर संघाच्या आर्यन पोलकर, रोनक कांबळे व लाड यांनी चांगला प्रतिकार केला मात्र त्यांना विजयापासुन दूर राहावे लागले.
पुरुषांच्या अंतिम सामन्यात सतेज बाणेर अ संघाने प्रकाशतात्या बालवडकर यासंघावर 50-22 असा विजय मिळवित हा सामना जिंकत या स्पर्धेतील अजिंक्यपद जिंकले. सतेज संघाच्या अक्षय जाधव, सुनिल दुबिले, सचिन पाटील यांनी चौफेर चढाया करीत आपल्या संघाला भक्कम आघाडी मिळवून दिली. त्यांना किरण मगर व मनोज बोंद्रे यांनी उत्कृष्ठ पकडी घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. प्रकाशतात्या बालवडकर संघाच्या बबलु गिरी व कृष्णा जगताप यांनी खोलवर चढाया केल्या तर किरण गंगणे व भाऊसाहेब गोजने यांनी सुरेख पकडी घेतल्या.
अत्यंत अटितटीच्या झालेल्या महिलांच्या अंतिम सामन्यात एम.एच.स्पोर्टस् संघाने द्रोणा स्पोर्टस् संघावर 28-25 गुणांनी विजय मिळवून स्पर्धेतील अंतिम विजेतेपदासह अजिंक्यपदही जिंकले. हा सामना शेवटच्या चढाई पर्यंत या सामन्यात रंगत भरली होती. हा सामना निर्धारित वेळेत 19-19 अशा समान गुणांवर संपला. त्यानंतर हा सामना पाच पाच चढाया देऊन खेळविण्यात आला. यामध्ये एम.एच. स्पोर्टस् संघाच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ करीत संघाला 28-25 असा विजय मिळवून दिला.