शिक्रापूर -कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील व्यायामशाळेत आमदार फंड आणि जिल्हा परिषद अध्यक्षांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या साहित्याची चोरी झाली आहे, याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरेगाव भीमा येथील व्यायामशाळेत यापूर्वी माजी आमदार बाबुराव पाचर्णे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या माध्यमातून विविध साहित्य देण्यात आले होते. व्यायामशाळा युवकांसाठी खुली ठेवण्यात आली आहे.
व्यायामशाळेचे व्यवस्थापक अविनाश देवकर सकाळी व्यायामशाळेत गेले असता, त्यांना व्यायामशाळेत अनेक साहित्य नव्हते तर काही साहित्यांची तोडफोड केल्याचे दिसले. याबाबत अविनाश देवकर यांनी फिर्याद दिली आहे.