पुणे- मुंबई एक्‍स्प्रेस वेवरील महामार्ग पोलिसांची चिंता मिटली

पुणे – बेशिस्त वाहनचालक आणि त्यांच्या रॅश ड्रायव्हिंगमुळे पुणे- मुंबई एक्‍स्प्रेस वेवरील महामार्ग पोलिसांची चिंता चांगलीच वाढली होती. मात्र, महामार्ग पोलिसांनी या बेशिस्त वाहनचालकांना आळा घालण्यासाठी सुरू केलेल्या “व्हॉट्‌सऍप’ ग्रुपमुळे या प्रकारांना चांगलाच आळा बसला आहे. ही बाब लक्षात घेऊन हा व्हॉटसऍप ग्रुप आणखी बळकट करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महामार्ग पोलिसांनी घेतला आहे. त्याशिवाय महामार्ग पोलिसांनी मुख्य कार्यालय आणि राज्याच्या गृह विभागाकडे परवानगीचा प्रस्ताव दिला आहे.

गेल्या काही वर्षांपूर्वी पुणे- मुंबई एक्‍स्प्रेस वेवर रॅश ड्रायव्हिंग आणि लेन कटिंगमुळे अपघातांचे प्रमाण वाढले होते. वाहनचालकांच्या या बेशिस्त वर्तनामुळे प्रवाशांना नाहक जीव गमवावा लागत होता. त्याशिवाय अनेकांना कायमचे अपगंत्व आले होते. त्यामुळे महामार्ग पोलिसांची चिंता आणखीनच वाढली होती. एखाद्या बेशिस्त वाहनचालकाने रॅश ड्रायव्हिंग केल्यास अथवा लेन कटिंग केल्यास महामार्ग पोलिसांना त्याची माहिती मिळत नव्हती. परिणामी या बेशिस्त वाहनचालकांवर पोलिसांना कारवाई करता येत नव्हती.

विशेष म्हणजे त्या माध्यमातून महामार्गावर आतापर्यंत अनेकदा छोटे- मोठे अपघात घडले आहेत. त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना राज्याच्या गृह विभागाच्या वतीने महामार्ग पोलिसांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार महामार्ग पोलिसांचे तत्कालीन पोलीस महासंचालक के. पद्मनाभन आणि तत्कालीन महामार्ग पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून महामार्ग पोलिसांसाठी “व्हॉट्‌सऍप’ ग्रुप सुरू करण्यात आला होता. महामार्ग पोलिसांकडे पुणे- मुंबई एक्‍स्प्रेस वेवर गस्त घालण्यासाठी सध्या सातशे पोलीस आणि पन्नास अधिकाऱ्यांचा ताफा तैनात आहे. त्यासाठी वेगवेगळी पथके तयार केली आहेत. मात्र, एखाद्या वाहनाने लेन कटिंग केल्यास अथवा वाहनचालकाने रॅश ड्रायव्हिंग केल्यास त्याची माहिती पुढे जाणाऱ्या पोलिसांच्या पथकाला आता शक्‍य होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.