पिंपरी, (प्रतिनिधी) – शहरात उभारण्यात येत असेलेल्या माता रमाई स्मारकाचे काम त्वरित मार्गी लावावे, यासाठी माता रमाई स्मारक समिती पिंपरी चिंचवडच्या वतीने धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून महापालिकेकडून हे काम प्रलंबित ठेवण्यात आले आहे. त्यास गती देण्याची मागणी समितीच्या वतीने करण्यात येत आहे. आमदार अण्णा बनसोडे यांनी आंदोलनकर्त्यांना भेट देत काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. गेले कित्येक दिवसंपासून माता रमाई यांच्या स्मारकाच्या कामास विलंब केला जात आहे.
हे काम त्वरित पूर्ण करावे, यासाठी माता रमाई स्मारक समिती पिंपरी चिंचवडच्या वतीने पिंपरीत धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्यास आमादर अण्णा बनसोडे यांनी भेट देत आंदोलनास पाठिंबा देत समितीचे अध्यक्ष धुराजी शिंदे व सर्व सहकारी यांच्याशी चर्चा केली. तसेच माता रमाई स्मारकाचे काम मार्गी लावण्याचे आश्वासन आमदार अण्णा बनसोडे यांनी दिले.